Posts

Women who shaped my life.

Image
Dear Mommy and Mumma, I owe everything I am today to you. The simple meals my grandmother prepared, like curd rice, instilled in me a preference for uncomplicated food. The diverse dishes my mother cooked taught me to appreciate local and authentic cuisine. From childhood, the consistent haircuts I received allowed me to break free from gender stereotypes. I was never bound by strict rules of fasting or worshipping any specific deity, which has enabled me to approach religious matters with a more open and logical mind. Despite being raised in a conservative environment, the freedom to think, explore, and question was always encouraged by these two remarkable women in my life. My upbringing fostered a simple yet rational outlook, imbued with a feminist perspective, cheers to your guidance. You, the women in my life, have been my foundation ! Emotions persist beyond words; hence, my feelings for you will forever remain incomplete, overflowing with abundance. Happy Women's Day ! Love ...

प्रदीप खेलूरकर (सेक्रेटरी, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, वर्धा)

Image
तो शिबिराचा पहिला दिवस होता , शांत , संयमी शब्दांत त्यांनी जे जे काही मांडलं ते ते सर्व आजही मनात रुतून बसलंय. माणसं येतात आणि जातात पण प्रदीप सर गेलेले नाहीयेत. ते आपल्यातंच आहेत.  दररोज संध्याकाळी 6 वाजता सेवाग्राम आश्रमात होणाऱ्या प्रार्थनेला सर 'बा' कुटीच्या बाहेर बसलेले आजही डोळ्यांसमोर दिसतात. सरांची वाक्यं , तो स्थितप्रज्ञ चेहरा आणि चेहऱ्यावरचं स्मित ; कैक गोष्टी सांगून जायचं.  त्या दिवशी आशाबेन (अध्यक्षा, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान) दिल्लीला जाणार होत्या म्हणून मी आशाबेन यांना काहीतरी लिहून द्या असं म्हणाले होते तेव्हा विचार आला ; प्रदीप सर इथेच आहेत त्यांना निवांत भेटता येईल , छान गप्पा होतील ,आयुष्यभरासाठी काहीतरी घेऊन जाता येईल. पण तो क्षण पुन्हा कधीच येणार नाहीये याची कल्पनाही केली नव्हती. शिबिरातील एखाद्या सत्रात सर अचानक मधेच येऊन शांतपणे कोणाला कळणार ही नाही अशा अंदाजाने येऊन बसत. त्यांच्या अनुभवांवरून आम्हाला बरंच काही सांगून जात.  प्राथनेवेळेचा सरांचा चेहरा... मार्गदर्शन करतानाचे सर... आणि सरांचं आयुष्य सारं काही एक मोठं पुस्तक आहे जे मला आयुष्यभर अभ्यासा...

Respect

Dear non-boys : Society is our , Natural scanner , Natural viewer , Natural commentator , &  Natural critic ! Society plays many roles for us , so it deserves respect , isn't it ?

सावरी

Image
                                                   आज सकाळी एका बागेत गेल्यावर तिथे बालपणीची एक आठवण आठवली. बालपण म्हटलं की कोकण डोळ्यासमोर तरळत राहतं.                                 शाळेची वाट म्हणजे अस्सल पायवाट होती. आजूबाजूला भले मोठे फार पूर्वीचे वृक्ष , एखाद-दुसरा जनावरांचा गोठा , कोकण म्हटलं की एक गोष्ट सुटत नाही ती म्हणजे नारळाचं झाड , काळ्या मिरीच्या उंचच उंच वेली , घरगुती लिंबाची झाडं , कुंपण घालून केलेली भाज्यांची मशागत आणि चारही बाजूने उतार असलेली ती सुंदर कौलारू घरं ; असं सारं काही त्या वाटेत होतं. वाडीचा रस्ता सोडून वेगळ्याच दिशेला शाळेची इमारत होती. सुरुवातीला चिऱ्याच्या 4-5 अपुऱ्या पायऱ्या आणि दगड गोटे , तिथून थोडं पुढं आल्यावर डाव्या बाजूला वळून सऱ्या ताईच्या अंगणातून मातीने मळलेली वाट पुढे जायची , मग उजव्या बाजूला सद्या आबांचा गोठा होता , तिथून पुढे गेल्याव...

It's YOU and just YOU

Image
                              Yes , you are right away from the world of filters and reels... You are right away from the room of watching lot of web series and movies... You are right away from coffee , red wine and many more.... away from pizza , burger , hot dogs , etc ... You are far far away from cafés , pubs and parties... You are away form those artificial eye lashes , nail art , shoes , goggles & jacket collections , etc.... You are away from lights of photoshoot... Away from nightouts with friends and you're not enjoying all that...                                It doesn't mean you are not aware of it. It doesn't mean you're old fashioned. It doesn't mean you're not happy , it really doesn't mean you're a serious type of person.                         ...

Flow like WATER

Image
                        Sometimes got stucked. Throat is saffocating all of sudden , water whispering with your cheeks , eyes are swelling , aching your head and heart pulling you out of everything.                         Scrolling your feelings of worriness , fear , getting anxious , luagh chills , there is pain in throat while swallowing & many more ; list is not getting its end. Scroll it , scroll it , scroll it and vanish all thoes from bin of your heart.                         Sometimes stones seems like flowers. Just learn the law of life. Flow like water ; with situations & emotions. Erase everything whenever it comes , just get away whenever you feel like you are stucked and fight whenever time calls you for a war. - ShamalDeepa

Give a HIFI

Image
Though I dont know anything about what I'll in the time next to me , when hands of clock turns their position more n more clockwise it feels too suffocating . If I have opportunity to hold or unhold anything... That would be hands of clock. Sometimes I wish to hold them and laugh crazily and sometimes want to unhold them to pass the time ASAP. Because of the pain of not having such opportunity everyone suffers this suffocation. Don't know what anything else ; but we all live in the fear of regret. I love swarm , the only reason is ; it didn't fade away suddenly , it took time and step by step fades away. But if everything went like swarm do , there will not be fear of downs and happiness of ups. So with thoes three hands of clock i.e. HOUR , MINUTE , SECOND ; not by holding or unholding them but by giving a hifi to them we can turn every moment into a  MEMORY . ShamalDeepa

Listen YOU

Image
      PC SHAMAL                           It is normal now as everyone is facing some psychological & emotional pressures ; so on a needy time no one is there to talk with , to share or to listen yourself. Don't you think , it is the time which suggests you to be honest friend of yourself first. There is one popular format of conversation i.e. MONOLOGUE ! Yes we all need monologue sometimes. And believe me it works. Having such conversation will give you relief.                                 Nonetheless we are afraid of feeling lonely , it is must to share your time with yourself . Have a courage to take it as its a chance for you & not your bad time. Because until I didn't get what I'm feeling , i think its useless to express that talks in front of someone.                 ...

Have a EFFORTLESS Smile

Image
PC : SHAMAL (To THE GIRL in me )                            You know what , everyone feels that ; How m I looking ? How people look at me ? Is there anything messy on my face ?  Are there dark circles ? How m I looking with this achnes ? What if my skin is tanned ? From "Mai kaisi lag rahi hoon" to "mi kashi distey" we all tries to judge our own looks , our own beauty and indirectly we hurt our own soul. Isn't it ?                               Why is this so ? On one side we hate people who tries to jugde us and on other side we ourselves judge our own soul everytime. It is okay to be what you are rather it will very beautiful if you can see beauty in your own without any makeover. It is not essential to be a different but it ought to be comfortable . No need to change the meaning of being forward. Sometimes you should try to be in a rol...

Suck the LIFE !

                            Sometimes situation turns beyond the fear. Even, we became unable to feel what is happening and what will ! Just travel through the path in front. May be its storm , may be its mirage , may be its dream & may be its a fact. Things often pass through our empty gaze like floody water flows.                             Sometimes we have to face anxiety about our wishes. Is it possible to complete my wish ? Is it okay if I give up ? Is it fine to ran away from everything ? What will happen if I have not explored , what if I have not confessed ? What to do if everything is faded like a flower within 10-12 hours of time ? What should I expect from me , from my life , from the time i have right now ?                             Sometimes you just have...

क्षण

Image
                                कितीही काही ठरवलं तरी काही क्षण हे निसटून जातातच !! वाहतं पाणी बघता - बघता डोळ्यांसमोरून निघून जातं ; अगदी तसेच !! त्यानंतर गोंधळ चालू होतो...अरे हे राहून गेलं , ते राहून गेलं...!! पण एक वेळ येते की ते राहून गेलेलं आठवण्यातही एक वेगळंच सुख आहे...!                 एक मात्र खरंय ; निसटून गेलेल्या क्षणांची कमी भरून काढण्यासाठी आपण आयुष्यभर कष्ट घेत बसतो पण ; निसटून नाही गेले तर ते क्षण कसले ?!!                 आपल्या रोजच्या जगण्यात खूप काही घडत असतं आजूबाजूला...म्हणजे अगदी सकाळी - सकाळी दुधवाल्या काकांनी दुधाची पिशवी देताना केलेलं स्मितहास्य.... भाजी विकत घेतल्यावर भाजी विकणाऱ्या काकूंचं 'हे घे लेकरा' असं म्हणणं.... बाजूच्या घरातलं एखादं लहानसं मांजर आपल्या घरातील कुंडीत बसून आपल्याकडे निरागसपणे पाहत असो... किंवा मग गर्दीच्या ठिकाणी पायऱ्यांवरून जाताना एखाद्या अनोळखी आजोबांनी आधार म्हणून आपल्या ...

काही नाही हो , सगळं नॅचरल असतं

Image
(जे काही आता माझ्याकडून बोललं/लिहिलं जातंय त्याला अपवाद असणाऱ्यांना क्षमस्व !!)                     नुकतीच 'फकिरा' कादंबरी वाचून झाली त्यात सगळं चित्तथरारक... धगधगता प्रवास...! इथे त्याचा संदर्भ देण्याचा मुद्दा असा की , फकिरा आणि सरुबाईचं एकमेकांवर अफाट प्रेम , एकमेकांना प्रचंड ओढ...!! मात्र कुठेही चुंबन , मिलनाचे वर्णन न करता भाऊंनी कसं मांडलं , हे कसब आश्चर्यात्मकच !!!                     बाईच्या शरीराचं वर्णन आणि पुरुषाची त्याकडे पाहताना होणारी घालमेल ज्यात लिहिली/दाखवली असेल तेच हल्लीच्या 'माणसांना'(?) रुचतं , पचतं किंबहूना भावतं...!! इंस्टाग्राम , फेसबुक , टिक-टॉक , etc...etc यांवर वाढलेले स्तन दाखवणारे फोटो , त्यांची हालचाल दाखवणारे व्हिडीओ , GIF पोस्ट्स करणारी कैक खाती 'K' आणि 'M' च्या घरात आपले फॉलोअर्स मिरवतात !! त्यांच्या लोकप्रियतेचं गमक हेच असावं बहुतेक..! आणि हो त्यांच्या अशा पोस्ट्स पाहून गालावर मंद हसू आणि अंगात एक तर्र मारणाऱ्यांची काही कमी नाही ! याउलट लिंगाचे व्...

संतोषचा सहारा

Image
                       जेव्हा ' बेटा तू मोठा झाल्यावर काय होणार ? ' - मुलाखतकार ' मी लेखक होणार ! ' - असं प्रथम वर्षात शिकणारा दत्ता म्हणतो आणि ' तुला संतोष सर का आवडतात ? ' - मुलाखतकार ' ते माझी पप्पी घेतात म्हणून ! ' - असं अवघ्या चार वर्षाचा किशोर सांगतो... तेव्हा खरंच या तरुणाला सलाम द्यावासा वाटतो !!                        बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पाटसरा या छोट्याशा खेडेगावात उसतोड कामगाराच्या पोटी जन्माला आलेलं आगळं पोरगं म्हणजे 'संतोष गर्जे' !! घरात दोन वेळचं खायला मिळायचा प्रश्न असताना... आपल्या बहिणीचं बाळंतपणातील पोर टाकून जीव सोडणं आणि तशा परिस्थितीत भाचीचा सांभाळ करता करता अशा कित्येक मुलांचे कित्तीतरी हाल होत असतील , त्यांचं काय असा विचार करून गेवराई या तालुक्याच्या गावापासून 3 किमी अंतरावर 'सहारा अनाथालय' उभारलेला हा पठ्ठ्या आजच्या तरुणांचा आदर्श ठरतोय...!               ही गोष्ट आहे एका अनाथांच्य...

' राजगड - अविस्मरणीय अनुभव '

Image
                    रात्रीचे १२ वाजून २५ मि. ... किन्न काळोख , कशाच्यातरी आधाराने स्वतःला सांभाळून उभं राहावं लागतंय इतका प्रचंड वारा... धो - धो पाऊस... पायांखालून वेगाने जाणारं पावसाचं पाणी... आणि त्या रात्री आम्ही ३५ लोक १३९४ मी उंचीवर होतो... जे पाहायला मिळेल , जे अनुभवायला मिळेल ते सारं काही नवीन आणि अविस्मरणीय होतं... आम्ही आपल्या लाडक्या राजाच्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून आजही डौलाने उभ्या असणाऱ्या राजगडावर होतो...                     बहामनी राजवटीपासून अस्तित्वात असणारा हा किल्ला सुरुवातीला मुरुम्बदेव किल्ला म्हणून ओळखला जायचा... पुण्याच्या नैऋत्येला ४८ किमी , वेळवंडी आणि गुंजवणी नद्यांच्या खोऱ्यात आणि आजूबाजूच्या डोंगररांगांमध्ये तीनही बाजुंना पसरलेला ; अवाढव्य किल्ला म्हणजे राजगड !! त्याकाळात वेढा घालण्यास अतिशय कठीण... सुवेळा माची , संजीवन माची आणि पद्मावती हि त्याची विस्तारलेली तीन मुखं... किल्ल्याच्या मध्यभागी उंच असा बालेकिल्ला... हे सारं काही मनात साठवत 'जय भवानी जय...

सैराटीयन

Image
                         सात वर्षांपूर्वीची एक घटना आठवते , मी हायस्कूलमध्ये शिकत होते तेव्हाची !! आमच्या भागात एक प्रसिद्ध मंदिर आहे.  तिथे दरवर्षी मोठी यात्रा असते. या यात्रेत एक मोठे महंत -  महाराज येतात आणि वर्षभराचे भाकीत करतात. भाकीत म्हणजे भविष्य ( Prediction - प्रेडिक्शन ) . त्या मंदिराच्या भागातील , परीसरातील काही गावांकरिता ते लागू पडतं... तर सात वर्षांपूर्वी ; यात्रेनंतर शाळेत आम्हा मुलींमध्ये चर्चा सुरू झाली... गप्पांचा विषय साधारण आठवडाभर तरी ते 'भाकीत'चं होता. त्यावेळी बऱ्याच गोष्टी त्या महंत - महाराजांनी भाकितात सांगितल्या होत्या , त्यात एक भाकीत असं होतं की , "भागातील बारा वर्षांच्या मुलीला बाळ होईल" .                        त्या काळात हे ऐकल्यावर तेव्हाच्या शाळकरी मनाला प्रश्न पडणं काही गैर नव्हतं. मी तेव्हा खूप घाबरले होते.  माझ्या शाळेतील कुणी ती मुलगी नसावी ; म्हणून मी बराच वेळ बोटात बोट अडकून ( फिंगर क्रॉस = मनात ईच्छा...

झोपडी

Image
                                 " अरे पार आणा... कुदळ घेऊन ये भाऊ... ए बाई काढती सगळं सामान का उकरायला लावू ?..." अंगावर शहारे आले...आज त्यांचे संसार गोळा केले होते आपल्यातल्या संकुचित मनोवृत्तीने !! त्यांची खोपटं उधळून टाकली होती ; आपल्यातल्या हाय-फाय की , कुठल्यातरी नावाच्या मानसिकतेने...!!!                            खूप गोंधळ ऐकू येत होता म्हणून ; खिडकीच्या गजांना घट्ट कवटाळून समोरचं दृश्य मनात चितारणं चालू होतं... पांढरपेशी वर्गातील 'माणसं' झोपडपट्टीतील लोकांशी काहीतरी वाद घालत होती... रात्रीच्या जेवणासाठी दिवसभर मजुरी आणि सकाळच्या दोन घासांसाठी रात्रपाळी करणाऱ्या त्या गोरगरिबांना अक्षरशः हाताला खेचून बाहेर काढणं चालू होतं... त्या पांढरपेशांना त्यांच्या वस्तीत त्यांच्या म्हणण्यानुसार असे गलिच्छ लोक नको होते... आता अशा पांढरपेशांच्या गलिच्छपणावर बोलायचे झाले तर... यांना माणसांची विष्टा दुर्गंधी आहे हे कळतं मात्र यांच्याच (...

' चल तरुणाई... '

Image
                                                                  तरुणाई , शूsss... आवाज नको करू... चल... चोरी करायला चल... 'चोरी'च करायला चल... हो , हो चोरी 'करायलाच'...  लाठी-मार , दगड-गोटे आणि झेंड्यांचीही... चोरी करायला चल... मंदिरातील गाभाऱ्याचीही...!  चोरी करायला चल मशिदीची , गुरुद्वाराची , चर्चची... 'सगळ्याच देव्हाऱ्यां'ची... चल तरुणाई , चोरून नेवूया आपण वासनेची भावना...आवाज नको करू...इथे ऐकायला 'लाख्खो' बसलेत 'आपापला बस्ता' घेऊन... 'कुऱ्हाडीनं' वार करतील... नाहीतर , नाहीतर तुझ्या नकळत ; तुझ्याच डोक्यातून बंदुकीची गोळी आरपार होईल... जी हल्ली अनेकांना चिकटतेय आणि चिकटवणारे मात्र चिकटवण्यासाठी वापरलेल्या डिंकामुळे डोळ्यांसमोरून गायब होतायंत... चल तरुणाई 'तो डिंक' आणि 'ते चिकटवणारेच' चोरून आणू... जिथे आहेत ; तिथून चोरून आणू...                      ...

' प्रिय शहरातल्या दादा....! '

Image
                                            दादा , काय म्हणतोयस ? शहर काय म्हणतंय तुझं ? ठीकच असणार , माहितीय मला....आणि हो हेही माहितीय की , हे पत्र वाचायला सुद्धा तुला वेळ नसणार ; इतका तू व्यस्त असतोस तुझ्या कामात ...! अरे परवाच गावी जाऊन आलो ; आठवड्याला जातोच मी , म्हटलं रव्या दादाच्या घरी जाऊन येऊ ...  स्टडी सर्कल   बंद झालं त्यानंतर काही भेटलोच नाही आपण... घरी गेलो होतो तुझ्या , तुझी माई भेटली म्हणजे ; माझी सुद्धा आहेच हं... म्हटलं माईच्या हातचा चहा पिऊया ! खूप दिवस चव घेतली नाही पण ; चव बदलली नाही हो अजूनही !! आणि हो तुला 'आलं' लागतं ना , तर माईने आठवण काढली होती , म्हणत होती ''रव्याला 'आलं' लागतं अरे चहामध्ये तुलाही आवडतं ना ?" रव्या दादा माईची तब्बेत खूप खराब झालीये रे . डोळे आत गेलेत आणि कपाळावरच्या आठ्या वाढलेत रे खूपच...!                       माईला पाहिलं की मला माझ्या आईची आठवण येते पण ; रागही य...

आयुष्य अन् मी

Image
                                                                                      माणसाचं मन म्हणजे खूप मोठा गुंता आहे...सोडवायचा जितका प्रयत्न कराल तितका तो वाढत जातो...गुंता वाढतो मग माणसांमधले बंधही सैल होतात कायमचेच...तो गुंता ' प्रेम ' , ' विश्वास ' , ' सोबत ' याबरोबरच ' तिरस्कार ' , ' विश्वासघात ' आणि ' विरह ' यांनी भरलेला असतो...! कसा सोडवायचा म्हटलं तर मन कैक विचारांनी सुन्न होतं...!! त्या विचारांना शंकेची पाल लागते आणि सकारात्मकता निघून जाते आणि गुंता सोडवून नात्याचे बंध पुन्हा जुळवण्याची शाश्वती देणेही कठीण होऊन जाते ! असं म्हणतात की , 'माणसे' ही आपली 'संपत्ती' असते पण स्थावर संपत्तीसाठी माणसं तुटताना पाहिली की , त्यावरचा विश्वासच उडतो...! शेवटी जे समोर येतं ते 'स्वीकारणे' अन्यथा त्यावर 'मात करणे' हे दोनच पर्याय उरतात आणि मानवी स्वभावधर्मानुसार माणूस 'मात क...

बांगड्या

Image
                                                                    माझ्यासारखीच दिसायला आणि बोलतेही चुणचुणीत अजुनही चेहऱ्यावर निरागसपण आणि गोंडसपण दिसते , देखणेपण तरी इतके की सुरेख वाटतो अगदी चेहरा ... त्यावर मग हळूच टिकली येते गोल थोडीशी मोठी , लाल रंगाची आणि जबरदस्तीने लावली आहे अशी दाबून रुतवलेली ...! तीही पेपर लिहितेय आणि मीही ... माझ्या हातात फक्त घड्याळ आणि त्यावर माझे लक्ष्य .... तिच्या हातात हिरव्या बांगड्या ... आणि ती घड्याळ बघत नाही तर कोवळ्या मनाने लिहिताना सारख्या मधे - मधे येणाऱ्या त्या बांगड्या मागे करते... मी खूप हसत - रमत लिहिते पेपर ती मात्र गांगरून जातेय ... समाजाच्या नजरांना की , तिच्याच वयाच्या आजही बालपण आणि तरुणपणाचा आस्वाद घेणाऱ्या तिच्या मैत्रिणींच्या...??? प्रश्नच ....! खूप मग्न होऊन लिहीत होती पेपर पण सर्वांचे लक्ष्य त्या बांगड्यांच्या आवाजाकडे सारखे सारखे जात होते ... माझेही ...! ...