क्षण
कितीही काही ठरवलं तरी काही क्षण हे निसटून जातातच !! वाहतं पाणी बघता - बघता डोळ्यांसमोरून निघून जातं ; अगदी तसेच !! त्यानंतर गोंधळ चालू होतो...अरे हे राहून गेलं , ते राहून गेलं...!! पण एक वेळ येते की ते राहून गेलेलं आठवण्यातही एक वेगळंच सुख आहे...! एक मात्र खरंय ; निसटून गेलेल्या क्षणांची कमी भरून काढण्यासाठी आपण आयुष्यभर कष्ट घेत बसतो पण ; निसटून नाही गेले तर ते क्षण कसले ?!! आपल्या रोजच्या जगण्यात खूप काही घडत असतं आजूबाजूला...म्हणजे अगदी सकाळी - सकाळी दुधवाल्या काकांनी दुधाची पिशवी देताना केलेलं स्मितहास्य.... भाजी विकत घेतल्यावर भाजी विकणाऱ्या काकूंचं 'हे घे लेकरा' असं म्हणणं.... बाजूच्या घरातलं एखादं लहानसं मांजर आपल्या घरातील कुंडीत बसून आपल्याकडे निरागसपणे पाहत असो... किंवा मग गर्दीच्या ठिकाणी पायऱ्यांवरून जाताना एखाद्या अनोळखी आजोबांनी आधार म्हणून आपल्या ...