Posts

Showing posts from August, 2019

संतोषचा सहारा

Image
                       जेव्हा ' बेटा तू मोठा झाल्यावर काय होणार ? ' - मुलाखतकार ' मी लेखक होणार ! ' - असं प्रथम वर्षात शिकणारा दत्ता म्हणतो आणि ' तुला संतोष सर का आवडतात ? ' - मुलाखतकार ' ते माझी पप्पी घेतात म्हणून ! ' - असं अवघ्या चार वर्षाचा किशोर सांगतो... तेव्हा खरंच या तरुणाला सलाम द्यावासा वाटतो !!                        बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पाटसरा या छोट्याशा खेडेगावात उसतोड कामगाराच्या पोटी जन्माला आलेलं आगळं पोरगं म्हणजे 'संतोष गर्जे' !! घरात दोन वेळचं खायला मिळायचा प्रश्न असताना... आपल्या बहिणीचं बाळंतपणातील पोर टाकून जीव सोडणं आणि तशा परिस्थितीत भाचीचा सांभाळ करता करता अशा कित्येक मुलांचे कित्तीतरी हाल होत असतील , त्यांचं काय असा विचार करून गेवराई या तालुक्याच्या गावापासून 3 किमी अंतरावर 'सहारा अनाथालय' उभारलेला हा पठ्ठ्या आजच्या तरुणांचा आदर्श ठरतोय...!               ही गोष्ट आहे एका अनाथांच्य...

' राजगड - अविस्मरणीय अनुभव '

Image
                    रात्रीचे १२ वाजून २५ मि. ... किन्न काळोख , कशाच्यातरी आधाराने स्वतःला सांभाळून उभं राहावं लागतंय इतका प्रचंड वारा... धो - धो पाऊस... पायांखालून वेगाने जाणारं पावसाचं पाणी... आणि त्या रात्री आम्ही ३५ लोक १३९४ मी उंचीवर होतो... जे पाहायला मिळेल , जे अनुभवायला मिळेल ते सारं काही नवीन आणि अविस्मरणीय होतं... आम्ही आपल्या लाडक्या राजाच्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून आजही डौलाने उभ्या असणाऱ्या राजगडावर होतो...                     बहामनी राजवटीपासून अस्तित्वात असणारा हा किल्ला सुरुवातीला मुरुम्बदेव किल्ला म्हणून ओळखला जायचा... पुण्याच्या नैऋत्येला ४८ किमी , वेळवंडी आणि गुंजवणी नद्यांच्या खोऱ्यात आणि आजूबाजूच्या डोंगररांगांमध्ये तीनही बाजुंना पसरलेला ; अवाढव्य किल्ला म्हणजे राजगड !! त्याकाळात वेढा घालण्यास अतिशय कठीण... सुवेळा माची , संजीवन माची आणि पद्मावती हि त्याची विस्तारलेली तीन मुखं... किल्ल्याच्या मध्यभागी उंच असा बालेकिल्ला... हे सारं काही मनात साठवत 'जय भवानी जय...