Posts

Showing posts from 2018

' चल तरुणाई... '

Image
                                                                  तरुणाई , शूsss... आवाज नको करू... चल... चोरी करायला चल... 'चोरी'च करायला चल... हो , हो चोरी 'करायलाच'...  लाठी-मार , दगड-गोटे आणि झेंड्यांचीही... चोरी करायला चल... मंदिरातील गाभाऱ्याचीही...!  चोरी करायला चल मशिदीची , गुरुद्वाराची , चर्चची... 'सगळ्याच देव्हाऱ्यां'ची... चल तरुणाई , चोरून नेवूया आपण वासनेची भावना...आवाज नको करू...इथे ऐकायला 'लाख्खो' बसलेत 'आपापला बस्ता' घेऊन... 'कुऱ्हाडीनं' वार करतील... नाहीतर , नाहीतर तुझ्या नकळत ; तुझ्याच डोक्यातून बंदुकीची गोळी आरपार होईल... जी हल्ली अनेकांना चिकटतेय आणि चिकटवणारे मात्र चिकटवण्यासाठी वापरलेल्या डिंकामुळे डोळ्यांसमोरून गायब होतायंत... चल तरुणाई 'तो डिंक' आणि 'ते चिकटवणारेच' चोरून आणू... जिथे आहेत ; तिथून चोरून आणू...                      ...

' प्रिय शहरातल्या दादा....! '

Image
                                            दादा , काय म्हणतोयस ? शहर काय म्हणतंय तुझं ? ठीकच असणार , माहितीय मला....आणि हो हेही माहितीय की , हे पत्र वाचायला सुद्धा तुला वेळ नसणार ; इतका तू व्यस्त असतोस तुझ्या कामात ...! अरे परवाच गावी जाऊन आलो ; आठवड्याला जातोच मी , म्हटलं रव्या दादाच्या घरी जाऊन येऊ ...  स्टडी सर्कल   बंद झालं त्यानंतर काही भेटलोच नाही आपण... घरी गेलो होतो तुझ्या , तुझी माई भेटली म्हणजे ; माझी सुद्धा आहेच हं... म्हटलं माईच्या हातचा चहा पिऊया ! खूप दिवस चव घेतली नाही पण ; चव बदलली नाही हो अजूनही !! आणि हो तुला 'आलं' लागतं ना , तर माईने आठवण काढली होती , म्हणत होती ''रव्याला 'आलं' लागतं अरे चहामध्ये तुलाही आवडतं ना ?" रव्या दादा माईची तब्बेत खूप खराब झालीये रे . डोळे आत गेलेत आणि कपाळावरच्या आठ्या वाढलेत रे खूपच...!                       माईला पाहिलं की मला माझ्या आईची आठवण येते पण ; रागही य...

आयुष्य अन् मी

Image
                                                                                      माणसाचं मन म्हणजे खूप मोठा गुंता आहे...सोडवायचा जितका प्रयत्न कराल तितका तो वाढत जातो...गुंता वाढतो मग माणसांमधले बंधही सैल होतात कायमचेच...तो गुंता ' प्रेम ' , ' विश्वास ' , ' सोबत ' याबरोबरच ' तिरस्कार ' , ' विश्वासघात ' आणि ' विरह ' यांनी भरलेला असतो...! कसा सोडवायचा म्हटलं तर मन कैक विचारांनी सुन्न होतं...!! त्या विचारांना शंकेची पाल लागते आणि सकारात्मकता निघून जाते आणि गुंता सोडवून नात्याचे बंध पुन्हा जुळवण्याची शाश्वती देणेही कठीण होऊन जाते ! असं म्हणतात की , 'माणसे' ही आपली 'संपत्ती' असते पण स्थावर संपत्तीसाठी माणसं तुटताना पाहिली की , त्यावरचा विश्वासच उडतो...! शेवटी जे समोर येतं ते 'स्वीकारणे' अन्यथा त्यावर 'मात करणे' हे दोनच पर्याय उरतात आणि मानवी स्वभावधर्मानुसार माणूस 'मात क...