Posts

Showing posts from October 10, 2017

बांगड्या

Image
                                                                    माझ्यासारखीच दिसायला आणि बोलतेही चुणचुणीत अजुनही चेहऱ्यावर निरागसपण आणि गोंडसपण दिसते , देखणेपण तरी इतके की सुरेख वाटतो अगदी चेहरा ... त्यावर मग हळूच टिकली येते गोल थोडीशी मोठी , लाल रंगाची आणि जबरदस्तीने लावली आहे अशी दाबून रुतवलेली ...! तीही पेपर लिहितेय आणि मीही ... माझ्या हातात फक्त घड्याळ आणि त्यावर माझे लक्ष्य .... तिच्या हातात हिरव्या बांगड्या ... आणि ती घड्याळ बघत नाही तर कोवळ्या मनाने लिहिताना सारख्या मधे - मधे येणाऱ्या त्या बांगड्या मागे करते... मी खूप हसत - रमत लिहिते पेपर ती मात्र गांगरून जातेय ... समाजाच्या नजरांना की , तिच्याच वयाच्या आजही बालपण आणि तरुणपणाचा आस्वाद घेणाऱ्या तिच्या मैत्रिणींच्या...??? प्रश्नच ....! खूप मग्न होऊन लिहीत होती पेपर पण सर्वांचे लक्ष्य त्या बांगड्यांच्या आवाजाकडे सारखे सारखे जात होते ... माझेही ...! ...