Dear Mommy and Mumma, I owe everything I am today to you. The simple meals my grandmother prepared, like curd rice, instilled in me a preference for uncomplicated food. The diverse dishes my mother cooked taught me to appreciate local and authentic cuisine. From childhood, the consistent haircuts I received allowed me to break free from gender stereotypes. I was never bound by strict rules of fasting or worshipping any specific deity, which has enabled me to approach religious matters with a more open and logical mind. Despite being raised in a conservative environment, the freedom to think, explore, and question was always encouraged by these two remarkable women in my life. My upbringing fostered a simple yet rational outlook, imbued with a feminist perspective, cheers to your guidance. You, the women in my life, have been my foundation ! Emotions persist beyond words; hence, my feelings for you will forever remain incomplete, overflowing with abundance. Happy Women's Day ! Love ...
अस्थिरलेलं आभाळ आणि झोंबणारा वारा जेव्हा खुणावत होता की , तुझी वाट थोडीशी चुकतेय तेव्हा खरंच स्वतःला इतकं समजावलं आणि योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी खूप उदाहरणेही दिली .... पायऱ्यांवरून जस जसे उतरत होते तस तसे जमीनही सांगत होती की , " तू जमीनदोस्त होणार नाहीस याची काळजी घे , ज्या ज्या वेळी गोंधळशील त्या त्या वेळी सावध राहा आणि सांग स्वतःला की जोवर पायाखाली जमीन आहे तोवर तू स्वतःला मुक्तपणे वागवशील , स्त्री आहेस म्हणून बंधनात न अडकता मोकळा विहार करशील ".... जेव्हा पाहिलं मी ४ मजली इमारतीकडे तेव्हा तीदेखील खुणावत होती मला , " एकटी नको राहू , मिसळून जा या जगतात , ते वाईट असो किंवा नसो पण विरघळून जा तू तुझ्या आसपास....., समुद्रात 'मोती' ही वास्तव्य करतो आणि खारट असणार 'मीठ' ही पण दोघेही गरजेचे असतात , तसच चांगले आणि वाईट दोन्ही प्रवृत्ती देखील गरजेच्या असतात , समाज वाईट आहे म्हणून स्वतःच स्वतःला दूर लोटून तू यशस्वी नाही होणार " पुढे पुढे मला आणि माझ्या केसांच्या बटींना छळणारा आणि त्याचा कोमल स्पर्श करून जाणार 'वारा' भेटला तो तर सांगत होत...
तो शिबिराचा पहिला दिवस होता , शांत , संयमी शब्दांत त्यांनी जे जे काही मांडलं ते ते सर्व आजही मनात रुतून बसलंय. माणसं येतात आणि जातात पण प्रदीप सर गेलेले नाहीयेत. ते आपल्यातंच आहेत. दररोज संध्याकाळी 6 वाजता सेवाग्राम आश्रमात होणाऱ्या प्रार्थनेला सर 'बा' कुटीच्या बाहेर बसलेले आजही डोळ्यांसमोर दिसतात. सरांची वाक्यं , तो स्थितप्रज्ञ चेहरा आणि चेहऱ्यावरचं स्मित ; कैक गोष्टी सांगून जायचं. त्या दिवशी आशाबेन (अध्यक्षा, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान) दिल्लीला जाणार होत्या म्हणून मी आशाबेन यांना काहीतरी लिहून द्या असं म्हणाले होते तेव्हा विचार आला ; प्रदीप सर इथेच आहेत त्यांना निवांत भेटता येईल , छान गप्पा होतील ,आयुष्यभरासाठी काहीतरी घेऊन जाता येईल. पण तो क्षण पुन्हा कधीच येणार नाहीये याची कल्पनाही केली नव्हती. शिबिरातील एखाद्या सत्रात सर अचानक मधेच येऊन शांतपणे कोणाला कळणार ही नाही अशा अंदाजाने येऊन बसत. त्यांच्या अनुभवांवरून आम्हाला बरंच काही सांगून जात. प्राथनेवेळेचा सरांचा चेहरा... मार्गदर्शन करतानाचे सर... आणि सरांचं आयुष्य सारं काही एक मोठं पुस्तक आहे जे मला आयुष्यभर अभ्यासा...