लाट
आयुष्य म्हणजे एक लाट आहे शांत किनाऱ्यावरची ! कधी ओहोटी येते तर कधी भरती येते . भवसागराच्या भावनांतून स्फुरणारी एक प्रतिकृती म्हणजे आयुष्य ! प्रत्येकाच्या भवसागराच्या भावना वेगवेगळ्या , लाटांच्या भरती- ओहोटीचा काळही वेगवेगळा .... काहीवेळा किनाऱ्यावरचा केर आत घेऊन जाणारी आणि काहीवेळा आतील केर किनाऱ्यावर टाकणारी लाट म्हणजे आयुष्य असं वाटतं मला ....! खूप गोष्टींना सामावून घेण्याची ताकद या लाटेमध्ये असते आणि खूप गोष्टींना झटकून टाकण्याचे बळही तिच्यामध्ये असते . कधी लाट एकटीच येते तर कधी लाटेला येण्यासाठी मार्गच लाभत नाही . अशावेळी ती उसळतेही किंवा विरतेही ....! माझी लाट मात्र एकटीच येते आणि मला वेढा घालून बसते तर कधी मला हट्टाने खारट पा...