' प्रिय शहरातल्या दादा....! '
दादा , काय म्हणतोयस ? शहर काय म्हणतंय तुझं ? ठीकच असणार , माहितीय मला....आणि हो हेही माहितीय की , हे पत्र वाचायला सुद्धा तुला वेळ नसणार ; इतका तू व्यस्त असतोस तुझ्या कामात ...! अरे परवाच गावी जाऊन आलो ; आठवड्याला जातोच मी , म्हटलं रव्या दादाच्या घरी जाऊन येऊ ... स्टडी सर्कल बंद झालं त्यानंतर काही भेटलोच नाही आपण... घरी गेलो होतो तुझ्या , तुझी माई भेटली म्हणजे ; माझी सुद्धा आहेच हं... म्हटलं माईच्या हातचा चहा पिऊया ! खूप दिवस चव घेतली नाही पण ; चव बदलली नाही हो अजूनही !! आणि हो तुला 'आलं' लागतं ना , तर माईने आठवण काढली होती , म्हणत होती ''रव्याला 'आलं' लागतं अरे चहामध्ये तुलाही आवडतं ना ?" रव्या दादा माईची तब्बेत खूप खराब झालीये रे . डोळे आत गेलेत आणि कपाळावरच्या आठ्या वाढलेत रे खूपच...! माईला पाहिलं की मला माझ्या आईची आठवण येते पण ; रागही य...