काही नाही हो , सगळं नॅचरल असतं
(जे काही आता माझ्याकडून बोललं/लिहिलं जातंय त्याला अपवाद असणाऱ्यांना क्षमस्व !!) नुकतीच 'फकिरा' कादंबरी वाचून झाली त्यात सगळं चित्तथरारक... धगधगता प्रवास...! इथे त्याचा संदर्भ देण्याचा मुद्दा असा की , फकिरा आणि सरुबाईचं एकमेकांवर अफाट प्रेम , एकमेकांना प्रचंड ओढ...!! मात्र कुठेही चुंबन , मिलनाचे वर्णन न करता भाऊंनी कसं मांडलं , हे कसब आश्चर्यात्मकच !!! बाईच्या शरीराचं वर्णन आणि पुरुषाची त्याकडे पाहताना होणारी घालमेल ज्यात लिहिली/दाखवली असेल तेच हल्लीच्या 'माणसांना'(?) रुचतं , पचतं किंबहूना भावतं...!! इंस्टाग्राम , फेसबुक , टिक-टॉक , etc...etc यांवर वाढलेले स्तन दाखवणारे फोटो , त्यांची हालचाल दाखवणारे व्हिडीओ , GIF पोस्ट्स करणारी कैक खाती 'K' आणि 'M' च्या घरात आपले फॉलोअर्स मिरवतात !! त्यांच्या लोकप्रियतेचं गमक हेच असावं बहुतेक..! आणि हो त्यांच्या अशा पोस्ट्स पाहून गालावर मंद हसू आणि अंगात एक तर्र मारणाऱ्यांची काही कमी नाही ! याउलट लिंगाचे व्...