' राजगड - अविस्मरणीय अनुभव '
रात्रीचे १२ वाजून २५ मि. ... किन्न काळोख , कशाच्यातरी आधाराने स्वतःला सांभाळून उभं राहावं लागतंय इतका प्रचंड वारा... धो - धो पाऊस... पायांखालून वेगाने जाणारं पावसाचं पाणी... आणि त्या रात्री आम्ही ३५ लोक १३९४ मी उंचीवर होतो... जे पाहायला मिळेल , जे अनुभवायला मिळेल ते सारं काही नवीन आणि अविस्मरणीय होतं... आम्ही आपल्या लाडक्या राजाच्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून आजही डौलाने उभ्या असणाऱ्या राजगडावर होतो... बहामनी राजवटीपासून अस्तित्वात असणारा हा किल्ला सुरुवातीला मुरुम्बदेव किल्ला म्हणून ओळखला जायचा... पुण्याच्या नैऋत्येला ४८ किमी , वेळवंडी आणि गुंजवणी नद्यांच्या खोऱ्यात आणि आजूबाजूच्या डोंगररांगांमध्ये तीनही बाजुंना पसरलेला ; अवाढव्य किल्ला म्हणजे राजगड !! त्याकाळात वेढा घालण्यास अतिशय कठीण... सुवेळा माची , संजीवन माची आणि पद्मावती हि त्याची विस्तारलेली तीन मुखं... किल्ल्याच्या मध्यभागी उंच असा बालेकिल्ला... हे सारं काही मनात साठवत 'जय भवानी जय...