Posts

सैराटीयन

Image
                         सात वर्षांपूर्वीची एक घटना आठवते , मी हायस्कूलमध्ये शिकत होते तेव्हाची !! आमच्या भागात एक प्रसिद्ध मंदिर आहे.  तिथे दरवर्षी मोठी यात्रा असते. या यात्रेत एक मोठे महंत -  महाराज येतात आणि वर्षभराचे भाकीत करतात. भाकीत म्हणजे भविष्य ( Prediction - प्रेडिक्शन ) . त्या मंदिराच्या भागातील , परीसरातील काही गावांकरिता ते लागू पडतं... तर सात वर्षांपूर्वी ; यात्रेनंतर शाळेत आम्हा मुलींमध्ये चर्चा सुरू झाली... गप्पांचा विषय साधारण आठवडाभर तरी ते 'भाकीत'चं होता. त्यावेळी बऱ्याच गोष्टी त्या महंत - महाराजांनी भाकितात सांगितल्या होत्या , त्यात एक भाकीत असं होतं की , "भागातील बारा वर्षांच्या मुलीला बाळ होईल" .                        त्या काळात हे ऐकल्यावर तेव्हाच्या शाळकरी मनाला प्रश्न पडणं काही गैर नव्हतं. मी तेव्हा खूप घाबरले होते.  माझ्या शाळेतील कुणी ती मुलगी नसावी ; म्हणून मी बराच वेळ बोटात बोट अडकून ( फिंगर क्रॉस = मनात ईच्छा...

झोपडी

Image
                                 " अरे पार आणा... कुदळ घेऊन ये भाऊ... ए बाई काढती सगळं सामान का उकरायला लावू ?..." अंगावर शहारे आले...आज त्यांचे संसार गोळा केले होते आपल्यातल्या संकुचित मनोवृत्तीने !! त्यांची खोपटं उधळून टाकली होती ; आपल्यातल्या हाय-फाय की , कुठल्यातरी नावाच्या मानसिकतेने...!!!                            खूप गोंधळ ऐकू येत होता म्हणून ; खिडकीच्या गजांना घट्ट कवटाळून समोरचं दृश्य मनात चितारणं चालू होतं... पांढरपेशी वर्गातील 'माणसं' झोपडपट्टीतील लोकांशी काहीतरी वाद घालत होती... रात्रीच्या जेवणासाठी दिवसभर मजुरी आणि सकाळच्या दोन घासांसाठी रात्रपाळी करणाऱ्या त्या गोरगरिबांना अक्षरशः हाताला खेचून बाहेर काढणं चालू होतं... त्या पांढरपेशांना त्यांच्या वस्तीत त्यांच्या म्हणण्यानुसार असे गलिच्छ लोक नको होते... आता अशा पांढरपेशांच्या गलिच्छपणावर बोलायचे झाले तर... यांना माणसांची विष्टा दुर्गंधी आहे हे कळतं मात्र यांच्याच (...

' चल तरुणाई... '

Image
                                                                  तरुणाई , शूsss... आवाज नको करू... चल... चोरी करायला चल... 'चोरी'च करायला चल... हो , हो चोरी 'करायलाच'...  लाठी-मार , दगड-गोटे आणि झेंड्यांचीही... चोरी करायला चल... मंदिरातील गाभाऱ्याचीही...!  चोरी करायला चल मशिदीची , गुरुद्वाराची , चर्चची... 'सगळ्याच देव्हाऱ्यां'ची... चल तरुणाई , चोरून नेवूया आपण वासनेची भावना...आवाज नको करू...इथे ऐकायला 'लाख्खो' बसलेत 'आपापला बस्ता' घेऊन... 'कुऱ्हाडीनं' वार करतील... नाहीतर , नाहीतर तुझ्या नकळत ; तुझ्याच डोक्यातून बंदुकीची गोळी आरपार होईल... जी हल्ली अनेकांना चिकटतेय आणि चिकटवणारे मात्र चिकटवण्यासाठी वापरलेल्या डिंकामुळे डोळ्यांसमोरून गायब होतायंत... चल तरुणाई 'तो डिंक' आणि 'ते चिकटवणारेच' चोरून आणू... जिथे आहेत ; तिथून चोरून आणू...                      ...

' प्रिय शहरातल्या दादा....! '

Image
                                            दादा , काय म्हणतोयस ? शहर काय म्हणतंय तुझं ? ठीकच असणार , माहितीय मला....आणि हो हेही माहितीय की , हे पत्र वाचायला सुद्धा तुला वेळ नसणार ; इतका तू व्यस्त असतोस तुझ्या कामात ...! अरे परवाच गावी जाऊन आलो ; आठवड्याला जातोच मी , म्हटलं रव्या दादाच्या घरी जाऊन येऊ ...  स्टडी सर्कल   बंद झालं त्यानंतर काही भेटलोच नाही आपण... घरी गेलो होतो तुझ्या , तुझी माई भेटली म्हणजे ; माझी सुद्धा आहेच हं... म्हटलं माईच्या हातचा चहा पिऊया ! खूप दिवस चव घेतली नाही पण ; चव बदलली नाही हो अजूनही !! आणि हो तुला 'आलं' लागतं ना , तर माईने आठवण काढली होती , म्हणत होती ''रव्याला 'आलं' लागतं अरे चहामध्ये तुलाही आवडतं ना ?" रव्या दादा माईची तब्बेत खूप खराब झालीये रे . डोळे आत गेलेत आणि कपाळावरच्या आठ्या वाढलेत रे खूपच...!                       माईला पाहिलं की मला माझ्या आईची आठवण येते पण ; रागही य...

आयुष्य अन् मी

Image
                                                                                      माणसाचं मन म्हणजे खूप मोठा गुंता आहे...सोडवायचा जितका प्रयत्न कराल तितका तो वाढत जातो...गुंता वाढतो मग माणसांमधले बंधही सैल होतात कायमचेच...तो गुंता ' प्रेम ' , ' विश्वास ' , ' सोबत ' याबरोबरच ' तिरस्कार ' , ' विश्वासघात ' आणि ' विरह ' यांनी भरलेला असतो...! कसा सोडवायचा म्हटलं तर मन कैक विचारांनी सुन्न होतं...!! त्या विचारांना शंकेची पाल लागते आणि सकारात्मकता निघून जाते आणि गुंता सोडवून नात्याचे बंध पुन्हा जुळवण्याची शाश्वती देणेही कठीण होऊन जाते ! असं म्हणतात की , 'माणसे' ही आपली 'संपत्ती' असते पण स्थावर संपत्तीसाठी माणसं तुटताना पाहिली की , त्यावरचा विश्वासच उडतो...! शेवटी जे समोर येतं ते 'स्वीकारणे' अन्यथा त्यावर 'मात करणे' हे दोनच पर्याय उरतात आणि मानवी स्वभावधर्मानुसार माणूस 'मात क...

बांगड्या

Image
                                                                    माझ्यासारखीच दिसायला आणि बोलतेही चुणचुणीत अजुनही चेहऱ्यावर निरागसपण आणि गोंडसपण दिसते , देखणेपण तरी इतके की सुरेख वाटतो अगदी चेहरा ... त्यावर मग हळूच टिकली येते गोल थोडीशी मोठी , लाल रंगाची आणि जबरदस्तीने लावली आहे अशी दाबून रुतवलेली ...! तीही पेपर लिहितेय आणि मीही ... माझ्या हातात फक्त घड्याळ आणि त्यावर माझे लक्ष्य .... तिच्या हातात हिरव्या बांगड्या ... आणि ती घड्याळ बघत नाही तर कोवळ्या मनाने लिहिताना सारख्या मधे - मधे येणाऱ्या त्या बांगड्या मागे करते... मी खूप हसत - रमत लिहिते पेपर ती मात्र गांगरून जातेय ... समाजाच्या नजरांना की , तिच्याच वयाच्या आजही बालपण आणि तरुणपणाचा आस्वाद घेणाऱ्या तिच्या मैत्रिणींच्या...??? प्रश्नच ....! खूप मग्न होऊन लिहीत होती पेपर पण सर्वांचे लक्ष्य त्या बांगड्यांच्या आवाजाकडे सारखे सारखे जात होते ... माझेही ...! ...

लाट

Image
                                                       आयुष्य म्हणजे एक लाट आहे शांत किनाऱ्यावरची ! कधी ओहोटी  येते तर कधी भरती येते . भवसागराच्या भावनांतून स्फुरणारी एक प्रतिकृती म्हणजे आयुष्य ! प्रत्येकाच्या भवसागराच्या भावना वेगवेगळ्या , लाटांच्या भरती- ओहोटीचा काळही वेगवेगळा ....                     काहीवेळा किनाऱ्यावरचा केर आत घेऊन जाणारी आणि काहीवेळा आतील केर किनाऱ्यावर टाकणारी लाट म्हणजे आयुष्य असं वाटतं मला ....!                      खूप गोष्टींना सामावून घेण्याची ताकद या लाटेमध्ये असते आणि खूप गोष्टींना झटकून टाकण्याचे बळही तिच्यामध्ये असते . कधी लाट एकटीच येते तर कधी लाटेला येण्यासाठी मार्गच लाभत नाही . अशावेळी ती उसळतेही किंवा विरतेही ....! माझी लाट मात्र एकटीच येते आणि मला वेढा घालून बसते तर कधी मला हट्टाने खारट पा...