लाट

                        
        

                    आयुष्य म्हणजे एक लाट आहे शांत किनाऱ्यावरची ! कधी ओहोटी येते तर कधी भरती येते . भवसागराच्या भावनांतून स्फुरणारी एक प्रतिकृती म्हणजे आयुष्य ! प्रत्येकाच्या भवसागराच्या भावना वेगवेगळ्या , लाटांच्या भरती- ओहोटीचा काळही वेगवेगळा ....
                    काहीवेळा किनाऱ्यावरचा केर आत घेऊन जाणारी आणि काहीवेळा आतील केर किनाऱ्यावर टाकणारी लाट म्हणजे आयुष्य असं वाटतं मला ....!
                     खूप गोष्टींना सामावून घेण्याची ताकद या लाटेमध्ये असते आणि खूप गोष्टींना झटकून टाकण्याचे बळही तिच्यामध्ये असते . कधी लाट एकटीच येते तर कधी लाटेला येण्यासाठी मार्गच लाभत नाही . अशावेळी ती उसळतेही किंवा विरतेही ....! माझी लाट मात्र एकटीच येते आणि मला वेढा घालून बसते तर कधी मला हट्टाने खारट पाणी चाखवते आणि मी त्याचा स्वीकार न करता माझ्या गोड्या पाण्याची चव चाखत बसते पण ; अलीकडे लाटेत आणि माझ्यात एक करार झाला आहे .....
                    ' मी खारट पाणी पचवायला शिकायचे आणि लाटेने माझे गोडे पाणी आपलेसे करायचे ! '
(आयुष्याच्या कठीण परिस्थितीला मी माझं समजून पार करेन आणि आयुष्याने माझ्या गोड क्षणांना आपलंसं करावं ) 
                     बस इतकंच माझं आणि माझ्या लाटेचं करारांनी भरलेलं नातं , मला हवं - हवंस आणि किनाऱ्याला नकोसं वाटणारं , किनाऱ्याच्या आणि लाटेच्या संघर्षाला आभाळरूपी मैत्राने सावरलेलं ...! असं 'आयुष्य अन् मी...!' 

Popular posts from this blog

Women who shaped my life.

' सहजच स्वतःशी केलेला संवाद '

प्रदीप खेलूरकर (सेक्रेटरी, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, वर्धा)