झोपडी
" अरे पार आणा... कुदळ घेऊन ये भाऊ... ए बाई काढती सगळं सामान का उकरायला लावू ?..." अंगावर शहारे आले...आज त्यांचे संसार गोळा केले होते आपल्यातल्या संकुचित मनोवृत्तीने !! त्यांची खोपटं उधळून टाकली होती ; आपल्यातल्या हाय-फाय की , कुठल्यातरी नावाच्या मानसिकतेने...!!! खूप गोंधळ ऐकू येत होता म्हणून ; खिडकीच्या गजांना घट्ट कवटाळून समोरचं दृश्य मनात चितारणं चालू होतं... पांढरपेशी वर्गातील 'माणसं' झोपडपट्टीतील लोकांशी काहीतरी वाद घालत होती... रात्रीच्या जेवणासाठी दिवसभर मजुरी आणि सकाळच्या दोन घासांसाठी रात्रपाळी करणाऱ्या त्या गोरगरिबांना अक्षरशः हाताला खेचून बाहेर काढणं चालू होतं... त्या पांढरपेशांना त्यांच्या वस्तीत त्यांच्या म्हणण्यानुसार असे गलिच्छ लोक नको होते... आता अशा पांढरपेशांच्या गलिच्छपणावर बोलायचे झाले तर... यांना माणसांची विष्टा दुर्गंधी आहे हे कळतं मात्र यांच्याच (...