' ती '
भयंकर ! पण ते भयंकर दृश्य भीतीसोबतच मला हिणवत होते की काय , काहीतरी खुणावत होते की काय असे तेव्हा वाटले. 'मेरी कोम' सिनेमा प्रदर्शित झाल्याचे ते पोस्टर होते. बोगद्याच्या एका डाव्या कोपऱ्यात ! पोस्टर पाहताना नजरेस काही वेगळेच दिसले , डोळ्यांवर माझा व माझ्यावर मनाचा विश्वासच बसत नव्हता .
'ती' होती तिथे . आपलं तीन - चार फाटक्या कापडांचं व एका खराब पोतडीचं गाठोडं घेऊन , अंगाभोवती एक पांढरं , मळकट , ठिगळानी शिवलेलं कापड गुंडाळून 'ती' तिथे निरागस डोळे करून बसली होती . आज मी पहिल्यांदाच तिला पाहिले होते . तिचा तो सावळा चेहरा , कुपोषित शरीरयष्टी , डोक्यावर खूप बारीक केस असलेले , डोळे खोगलांत पार आत गेलेले , ओठ पाण्याविना तरसलेले , सुकलेले , हात नेहमी गुडघ्यांच्या बाजूने पीळ घातलेले व पाय मात्र वाट शोधण्याच्या आशेवर जगणारे ! असा तिचा सारा देह , पाहताक्षणी मनाला राहवेना ; काहीच सुचनासे झाले. बोगद्याच्या त्या एका भिंतीला टेकून 'ती' काहीतरी वाईट अनुभवत होती . गाड्यांची ये - जा चालूच होती . मी 'क्लास' वरून आले , 'ती' मात्र तिथेच त्याच आशेवर जगत होती . तिला पाहिले की , असंख्य प्रश्न मनात यायचे ,
" तिचे कोणीच नसेल का ? 'ती' अशी शांत का आहे ? तिला घरातून हाकलले असावे का ? तिला काय त्रास होत असेल ? 'ती' कोणाची आई , बहीण , मुलगी असेल ? मी तिच्याशी बोलले तर ती माझ्याशी बोलेल का ? 'ती' भिकारी असेल का ? मग 'ती' पैसे का मागत नाही ? 'ती' काय खाऊन पोट भरत असेल ? 'ती' रात्रीच्या प्रत्येक तासाला व त्या तासांतील प्रत्येक मिनिटाला काय विचार करत असेल ? तिच्या डोक्यावर परिणाम तर झाला नसेल ना ? मग ती काही बडबडत का नाही ? 'ती' इथेच का राहते ? तिचे नातलग तिला नेत का नाहीत ? सुख नावाची गोष्ट तिला माहीत असेल का ? 'ती' काय वेदना भोगत असेल ? 'ती' कोणाची वासना म्हणून जगते ? या अंधाऱ्या जगात तिला प्रकाशाची वाट मिळेल का ? की , 'ती' नेहमी अंधारच पाहिलं ? असे शेकडो प्रश्न मला सतावू लागले , असे वाटत होते की , आत्ताच्या आत्ता तिला घरी घेऊन जावं ; पण मोठ्यांची परवानगी ?
दगडालाही पाझर फुटतो हो पण कधी कोणाला अशा 'ती'चं दुःख जाणवलं तरी का ???
गाड्या , ट्रक , दुचाकी , चारचाकी , सायकल कितीतरी वाहने तिथून जात हाती ; पण त्या वाहनांप्रमाणे ती मात्र कुठे जातही नव्हती अन जागची हालतही नव्हती , दुसऱ्या दिवशीपण क्लासला जाताना 'ती' तिथेच होती. तिचा तो निरागस पण गोंधळलेला , खरा पण घाबरलेला , प्रेमळ आणि निरपराधी चेहरा पाहून मनाला राहवत नव्हतं. 'एकटेपणा आणि दुःखाची साक्षीदार म्हणून जगत होती . निष्ठुर जगाची आंधळी माणुसकी तिला दिसत होती'. काही पक्ष्यांचे आवाज ऐकल्यावर जो आनंद आपल्या चेहऱ्यावर येतो तोच आनंद शाळेला जाणाऱ्या लहान मुलांचे आवाज ऐकल्यावर तिला व्हायचा ; पण तोदेखील
क्षणभंगुर !
तिच्या चेहऱ्याने मला एक नवं आव्हान दिलं होतं की , जगण्याचा एक अनुभव जो मी आजवर कधी पाहिलाही नव्हता ; हेच कळत नव्हतं . तिची परिस्थिती इतकी खालावली होती की मला माझ्याच जगण्याची लाज वाटत होती . कारण आपणही माणूसच आहोत आपल्यालाही भावना आहेत मग आपण आपल्या डोळ्यांदेखत तिची 'ही' अवस्था कशी पाहू शकतो ???
प्रत्येक वाहन येत होतं पुन्हा काही वेळाने जात होतं पण प्रश्न हा होता की , त्याच वाहनाप्रमाणे 'ती' का पुन्हा तिच्या घरी जात नाहीये ? कदाचित तिचं कोणी नव्हतंच का !!!
तिचं रोजचं 'जिणं' मी रोज पाहत होते . एक दिवस म्हणता - म्हणता 'ती' एक आठवडा त्याच कोपऱ्यात होती . मी रोज क्लास ला जायचे तिही रोज तिथे झोपलेली किंवा कोणाचीतरी वाट पाहताना दिसायची .
'ती' ज्याची कोणाची वाट पाहत होती 'ते' का येत नाहीयेत ? हेच कळत नव्हतं . देवाला मुके जीव चालतात . ते मुके जीव कष्ट करून पोटापाण्याचा प्रश्न मिटवून जगावेत अशी चोख व्यवस्था त्याने केली आहे . पण , मानसिक त्रासानं बेहाल झालेल्या 'ती' सारख्या व्यक्तींचं काय ?
'ती' अशीच मनाने तुटलेली अनाधार 'कुणीतरी' होती . 'ती' कोणीतरी एकटीच होती , भावनांचा सूर्य कधीच मावळून गेलेल्या जगात ती जगत होती हीच तिची घोडचूक !!!
अशा कितीतरी 'ती' असतील , कितीतरी 'एकट्या' असतील. मन आणि मनोभोवतीचा चक्रावणारा विचार आणि हेलावून टाकणारा हा अनुभव म्हणजे आपण खूप भाग्यवान आहोत याची सिद्धताच .
लावूया का थोडा हातभार आपापल्या परीने ? थोडं सांभाळूया का त्यांना ? माणुसकी हरवलेल्या या जगात अशा अनेक 'ती' आहेत , चला त्यांचा आधार बनूया.

( स्वानुभव )