Posts

' ती '

                    भयंकर ! पण ते भयंकर दृश्य भीतीसोबतच मला हिणवत होते की काय , काहीतरी खुणावत होते की काय असे तेव्हा वाटले. 'मेरी कोम' सिनेमा प्रदर्शित झाल्याचे ते पोस्टर होते. बोगद्याच्या एका डाव्या कोपऱ्यात ! पोस्टर पाहताना नजरेस काही वेगळेच दिसले , डोळ्यांवर माझा व माझ्यावर मनाचा विश्वासच बसत नव्हता .                    'ती' होती तिथे . आपलं तीन - चार फाटक्या कापडांचं व एका खराब पोतडीचं गाठोडं घेऊन , अंगाभोवती एक पांढरं , मळकट , ठिगळानी शिवलेलं कापड गुंडाळून 'ती' तिथे निरागस डोळे करून बसली होती . आज मी पहिल्यांदाच तिला पाहिले होते . तिचा तो सावळा चेहरा , कुपोषित शरीरयष्टी , डोक्यावर खूप बारीक केस असलेले , डोळे खोगलांत पार आत गेलेले , ओठ पाण्याविना तरसलेले , सुकलेले , हात नेहमी गुडघ्यांच्या बाजूने पीळ घातलेले व पाय मात्र वाट शोधण्याच्या आशेवर जगणारे ! असा तिचा सारा देह , पाहताक्षणी मनाला राहवेना ; काहीच सुचनासे झाले. बोगद्याच्या त्या एका भिंतीला टेकून 'ती' काहीतरी ...

' सहजच स्वतःशी केलेला संवाद '

अस्थिरलेलं आभाळ आणि झोंबणारा वारा जेव्हा खुणावत होता की , तुझी वाट थोडीशी चुकतेय तेव्हा खरंच स्वतःला इतकं समजावलं आणि योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी खूप उदाहरणेही दिली .... पायऱ्यांवरून जस जसे उतरत होते तस तसे जमीनही सांगत होती की , " तू जमीनदोस्त होणार नाहीस याची काळजी घे , ज्या ज्या वेळी गोंधळशील त्या त्या वेळी सावध राहा आणि सांग स्वतःला की जोवर पायाखाली जमीन आहे तोवर तू स्वतःला मुक्तपणे वागवशील , स्त्री आहेस म्हणून बंधनात न अडकता मोकळा विहार करशील ".... जेव्हा पाहिलं मी ४ मजली इमारतीकडे तेव्हा तीदेखील खुणावत होती मला , " एकटी नको राहू , मिसळून जा या जगतात , ते वाईट असो किंवा नसो पण विरघळून जा तू तुझ्या आसपास....., समुद्रात 'मोती' ही वास्तव्य करतो आणि खारट असणार 'मीठ' ही पण दोघेही गरजेचे असतात , तसच चांगले आणि वाईट दोन्ही प्रवृत्ती देखील गरजेच्या असतात , समाज वाईट आहे म्हणून स्वतःच स्वतःला दूर लोटून तू यशस्वी नाही होणार " पुढे पुढे मला आणि माझ्या केसांच्या बटींना छळणारा आणि त्याचा कोमल स्पर्श करून जाणार 'वारा' भेटला तो तर सांगत होत...